तिळ – गुळासारखी गोड कविता शुभेच्छारूपी आपल्या प्रियजनांना पाठवा व नात्यातील गोडवा अजून वाढवा
‘मकर संक्राति’ म्हंटल की,तीळ – गुळाचे लाडू डोळयासमोर आल्याशिवाय राहत नाहीत.हा सण नात्यांतील गोडवा वाढवण्याचा सणं म्हंटल तरी हरकत नाही. आजच्या दिवशी जुने रुसवे – फुगवे सगळं विसरून एकमेकांना तीळ गूळ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. आपला स्वभाव हा तिळासारखा थोडा कडु तर गुळासारखा गोडही असतो तसेच थंडीच्या दिवसांत तीळ गूळ शरीरासाठी चांगले असतात आणि म्हणूनच संक्रातिच्या दिवशी तीळ गूळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.पण या शुभेच्छा देण्यासाठी आपण तेवढेच गोड शब्द जर वापरले तर नातं अजूनच गोडं होईल.चला तर मग आजच्या दिवशी ही गोड कविता आपल्या प्रियजनांना पाठवून शुभेच्छा द्या.
संक्रातीच्या सणाला
वाण घ्या आपुलकीचे,
तिळाच्या स्नेहाप्रमाणे अन,
गुळाच्या गोडव्याचे
समृद्धीची भरारी घेत
पतंगापेक्षाही उंच उडावं
वादळ वाऱ्यात न अडकता
प्रेमाचं नातं मात्र जपावं
कधी येतील क्षण कडूही
मग साथ ना सोडावी त्या तिळाची
शेवटी तिळावीना तरी
गोडी काय त्या गुळाची ?
तिळाला घट्ट बांधणाऱ्या
गुळाप्रमाणे असावा विश्वास
आपलेपणा खरा असावा
नसावा फक्त भास
म्हणूनच, शब्दांतही प्रेम असावे
नको भार फक्त तिळगुळावर
राहो सदा आशीर्वाद देवाचा
तुम्हा आम्हा सगळ्यांवर
मकर संक्रातीच्या शुभेच्छा !