पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अनुकूल वातावरण असल्यामुळे पुढील 48 तासात मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही धडकण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकलेय.
उपग्रह छायाचित्र ११.४५ रात्री, चक्रिवादळाच्या सावटाखालीही, #केरळ, #कर्नाटक, #गोवा व #तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. परिस्थिती मान्सुनसाठी अनुकुल होत आहे. pic.twitter.com/UC7KiaCzhD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2023