MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २०२४ मध्ये MPSC खालील स्पर्धा परीक्षा घेणार आहे:

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर
  • न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग
  • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा
  • राज्यसेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा
  • महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा
  • महाराष्ट्र कृषी सेवा
  • महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा
  • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा
  • निरीक्षक वैद्यमापक शास्त्र

MPSC ने या वेळापत्रकात काही बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोगाचे उपसचिव दे.वि.तावडे यांनी केले आहे.

Scroll to Top