निगडी: पीएमपीएमएल वाहकाच्या मुलाची ‘चार्टर्ड अकांउटेंट'(CA) म्हणून निवड
निगडी:-पीएमपीएमएलच्या भक्ति-शक्ती आगारातील वाहक चेतन ओच्छानी यांचा मुलगा सी.ए.परिक्षा पास होऊन “चार्टर्ड अकांउटेंट”म्हणून निवड झाल्याबद्ल पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियन यांच्यावतीने आज चेतन ओच्छानी व राहुल ओच्छानी यांचा आगार व्यवस्थापक यशवंत हिंगे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खुशखबर : पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातवा वेतन आयोग लागू ….
Expanding Opportunities: Work-from-Home Jobs in Pune for Housewives
यावेळी आगार व्यवस्थापक यांनी बोलताना सांगितले की, राहुल यांनी आपल्या वडिलांच्या कष्टाची जाण ठेवुन पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करुन पीएमपीएमएल संस्थेचे व ओच्छानी कुटुंबियांचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कामगार नेते रविंद्र लांडगे,संतोष शिंदे,प्रफुल्ल शिंदे,आकाश तिवारी,उमाजी शिंदे,तुकाराम खानेकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर कामगार उपस्थित होते.