Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

ऑनलाईन मोबाईलचे ऑर्डर करून अशा प्रकारे करायचे फसवणूक ,९८,५००/- रु. किंमतीचे मोबाईल जप्त !

Pune :ऑनलाईन किंमती मोबाईलचे ऑर्डर करून मोबाईल कंपनीची फसवणूक करणा-या टोळीस खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केले जेरबंद केलं आहे  दि. २९/०४/२०२३ रोजी खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांना झॅफ इंटरप्रायजेस कंपनी,कोंढवा खुर्द, पुणे यांचे कंपनीतील डिलिव्हरी बॉय यांना काही इसम हे डिलीव्हरी बॉय कडून पार्सल घेतेवेळी त्यास बोलण्यामध्ये गुंतवणून ठेवून पार्सल बॉक्स मधील मोबाईल काढून घेवून त्या बॉक्समध्ये परत साबण्याच्या वडया ठेवून बॉक्स तसाच पॅक करून पैसे न देता ती ऑर्डर परत करून फसवणूक करीत आहेत.

500 + मराठा वधू बायोडाटा | ९६ कुळी मराठा वधू फोटो

अशी माहिती मिळाल्याने खंडणी विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व पोलिस स्टाफ यांनी कंपनीकडील लोकांना सोबत घेवून सेनापती बापट रोड, पुणे येथील एका हॉटेल मध्ये इसम नामे १) अभिषेक हरिभाऊ कंचार वय २० वर्षे, रा. श्रीगणेश छाया बिल्डींग, फलॅट नं.२०१, दिवा पुर्व ठाणे २) धीरज दिपक जावळे वय २१ वर्षे, रा.ए. विंग, ५१० सिजन सहारा रिजेन्सी, फिफटी फिफटी ढाब्याजवळ, नांदिवली, कल्याण पुर्व ३) आदर्श ऊर्फ सनी शिवगोंविद चौबे वय २५ वर्षे, रा. कस्तुरी प्लाझा चाळ, रुम नं. ४, मानपाडा रोड, डोंबिवली ईस्ट, ठाणे यांना छापा कारवाई दरम्यान ताब्यात घेऊन त्यांचे अंगझडती मध्ये एकूण ९८,५००/- रु. किंमतीचे फसवणुकीचे मोबाईल मिळून आले आहेत.

DTP Operator Skills : पुणे महानगरपालिके तर्फे व्यावसायिक प्रशिक्षण योजना सुरू

सदर बाबत चतुःश्रृंगी पो. स्टे येथे गु.र.नं. २९६ / २०२३ भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक १ चे पो. उप-निरीक्षक विकास जाधव हे करीत आहेत. सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त १ गुन्हे शाखा श्री. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोउनि / विकास जाधव, पोलीस अंमलदार मधुकर तुपसौंदर,प्रविण ढमाळ, सयाजी चव्हाण, रविंद्र फुलपगारे, हेमा ढेबे, नितीन कांबळे, किरण ठवरे, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More