पंकजा मुंडे आणि अमित शाह आज एकाच मंचावर !

नांदेड : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातही 30 जूनपर्यंत भाजपने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. आज भाजपची नांदेडमध्ये सभा होत आहे.

 

या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही या सभेला संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी काही धक्कादायक विधानंही केली होती.

हे  वाचाGoogle ने शिक्षकांसाठी नवीन AI टूल लाँच केले आहे .

त्यामुळे या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि अमित शाह पहिल्यांदाच एका मंचावर येत असल्याने आजच्या नांदेडमधील सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे-पालवे ह्या मराठी राजकारणी आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे त्या २०१९ ऑक्टोबरपर्यंत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होत्या.

हे वाचाबेसिक कॉम्प्युटर कोर्स (Basic Computer Course) ऑनलाइन: फक्त ४०० रुपये मध्ये प्रमाणपत्र देखील

अमित शाह हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. अमित शाह हे भारतीय राजकारणी आहे. हे भारताचे विद्यमान गृहमंत्री आहे. हे भारतीय जनता पक्षाचे १३वे व विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. अमित शहा यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला.

Leave a Comment