खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून ५० हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक केलेप्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर- अँड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांचे युक्तिवाद…
पुणे, 19 ऑक्टोबर 2023: खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी देण्याचे अमिष दाखवून 50 हून अधिक नोकरी इच्छुकांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांनी त्यांच्या वकिलीतून हे जामीन मिळवले.
भोसरी पोलीस स्टेशन येथील दिनांक २६.०६.२०२३ रोजी गुन्हा भा.द.वि. कलम 420,419,406, 465, 467, 468 व 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणात ४ आरोपींचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपासात अजुन ०३ आरोपीचे नांव निष्पन्न झाले. फरार आरोपी अरविंद हरिशचंद्र कोळी व आरती हरिशचंद्र कोळी यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केली अशी माहिती, अॅड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांनी दिली.
अरविंद कोळी व आरती कोळी यांचे बँक खात्यात गुन्ह्यात मुख्य आरोपी क्र. ०१ महेशकुमार कोळी यांचे मोठ्या प्रमाणात ऑनलाई ट्रॉन्झक्शन दिसत होते. म्हणून पुढील तपासात त्यांचे नाव निष्पन्न झाले. तसेच फरार आरोपी नामे अरविंद कोळी व आरती कोळी यांनी अॅड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांचे मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांचे कोटांत झालेले सुनावणीवेळी युक्तिवाद करताना अॅड. हर्षवर्धन राजपुरोहीत यांनी कोटांत सांगितले की, फरार आरोपींचे गुन्हयामध्ये कुठल्याही प्रकारचा थेट सहभाग नाही. व त्यांचे विरुद्ध ठोस पुरावे उपलब्ध नाहीत व आरोपी क्र. १ चे ट्रॉन्झॅक्शन शी सदर आरोपी यांचा कोणताही थेट संबंध नाही. आरोपी निरपराध असून त्यांचेवर कोणत्याही प्रकारचे पूर्वीचे गुन्हे नसल्याचे सांगितले.
न्यायालयाने अँड. राजपुरोहीत यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आणि उच्च न्यायालयाचे विविध निकालांचे आधार धरून सदर फरार आरोपींचा योग्य त्या मे. कोटांच्या अटी आणि शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.