पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 2023 ची आयट्वेंटी कार पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळून जात होती. कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली.
कारमध्ये चार ते पाच जण होते अशी माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पाणी खूप खोल असल्याने कार बाहेर काढणे शक्य झाले नाही.
भारतीय सैन्यात तब्बल 41,822 पदांसाठी मेगाभरती जाहीर
कारमध्ये बुडलेल्या व्यक्तींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत किती जण मरण पावले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.