---Advertisement---

Pune Car Accident : पुणे-पानशेत रोडवर अपघात, कारसह धरणात बुडालेल्या मुलीचा मृत्यू

On: August 31, 2023 9:18 AM
---Advertisement---

Pune Car Accident  पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावाच्या हद्दीत आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कार अपघात झाल्यानंतर थेट खडकवासला धरणात शिरली. त्यामुळं किमान चार ते पाच जण कारसह धरणात बुडाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 2023 ची आयट्वेंटी कार पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळून जात होती. कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली.

कारमध्ये चार ते पाच जण होते अशी माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पाणी खूप खोल असल्याने कार बाहेर काढणे शक्य झाले नाही.

भारतीय सैन्यात तब्बल 41,822 पदांसाठी मेगाभरती जाहीर

कारमध्ये बुडलेल्या व्यक्तींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत किती जण मरण पावले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment