Pune : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंध मोहीम, गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस अटक

मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहरअग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक करुन गावठी पिस्टलासह जिवंत काडतुस केले जप्त

दि.०७/११/२०२३ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे यांचे आदेशाने मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार हे मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या दिवाळी सणाचे अनुषंगाने गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना मुंढवा तपास पथकातील अंमलदार दिनेश राणे व स्वप्नील रासकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की इसम नामे आदीत्य महेश चौधरी वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३, ताडीवाला रोड पुणे. हा मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत फिरत असून त्याच्याजवळ तो गावठी पिस्टल बाळगून आहे.

वरील मिळालेल्या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याबाबतचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विष्णु ताम्हाणे यांनी दिलेवर मुंढवा तपास पथक अधिकारी सपोनी श्री. संदीप जोरे व स्टाफ जाहागिर चौक ते आंबेडकर चौक, घोरपडी, मुंढवा, पुणे या रस्त्यावर जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे आदीत्य महेश चौधरी वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३, ताडीवाला रोड पुणे. यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपी विरुध्द मुंढवा पोलीस ठाणे गु.नं ३६३/२०२३ आर्म अॅक्ट कलम ३, (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असुन गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

  • मुंढवा पोलिसांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंध गस्त केली.
  • तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आदीत्य महेश चौधरी हा गावठी पिस्टल बाळगून फिरत आहे.
  • पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याचेकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त केले.
  • चौधरी याच्यावर आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scroll to Top