Marathi News

Shivajinagar : पुणे सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने लॅपटॉप चोरी करून पसार झालेल्या संगणक अभियंत्याला अटक

पुणे, ८ मार्च २०२४: शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने एका धक्कादायक कारवाईत लॅपटॉप चोरी करून पसार झालेल्या संगणक अभियंत्याला अटक केली आहे. आरोपी समीर रामनाथ थोरात (वय ३९) हा पुण्यातील रहिवासी आहे.

गुन्ह्याची माहिती:

फिर्यादी यांनी त्यांचे संगणक विक्री व दुरुस्तीचे दुकानात हार्डवेअर इंजिनिअर समीर रामनाथ थोरात यांना सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान नोकरीस ठेवले होते. फिर्यादी हे दुबई येथे गेलेले असल्याचा गैरफायदा घेऊन थोरात यांनी दुकानातील ४ लॅपटॉप व इतर साहीत्य तसेच ग्राहकांकडून कॉम्प्युटरचे साहीत्य असे परस्पर घेऊन पसार झाले.

पोलिसांची कारवाई:

फिर्यादी यांनी थोरात यांच्याविरोधात तक्रार दिल्याने फसवणुकीचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४५/२०२४ भादवि ४२०,४०८ प्रमाणे नोंद करण्यात आला. पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल्ल यांनी वरील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सुचना सायबर पथकाला दिल्या.

आरोपीचा अटक:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार आरोपी थोरात याला अहमदनगर व छ. संभाजीनगर येथे कुशलतेने शोध घेऊन यशस्वी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे वरील गुन्ह्याबाबत चौकशी करुन, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ८ मार्च २०२४ रोजी वरील गुन्हयात अटक करण्यात आली.

गुन्हेगारी मालमत्ता:

आरोपी थोरात याच्याकडून गुन्ह्यातील १,४०,०००/- रुपये किंमतीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेले आहेत.

पोलिस टीम:

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त संदिपसिंह गिल्ल, सहा पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली.

 

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *