Pune News : प्रेम विवाहावर पॉक्सोची टांगती तलवार? २ महिन्यात तरुणाला जामीन

मुलाचा पॉक्सो खटल्यात अवघ्या २ महिन्यात जामीन मंजूर

पुणे: मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असलेला सेशराज हिरामण रावत याला अल्पवयीन मुलीसोबत मंदिरात प्रेम विवाह केल्याबद्दल पोक्सो कायद्याअंतर्गत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Pune News )

२ महिन्यांत जामीन मंजूर:

  • गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आणि आरोपी परप्रांतीय असल्यामुळे तो पळून जाण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला होता.
  • आरोपीच्या वकीलांनी पीडिता वैवाहिक जीवन समजण्यास समजदार असून स्वेच्छेने आरोपीसोबत राहत होती, असा युक्तिवाद केला.
  • आरोपी भारतीय नागरिक असल्याने त्याला घटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत, असा युक्तिवादही वकीलांनी केला.
  • पॉक्सो कायदा हा अपराध्यांना शिक्षा देण्यासाठी असून, प्रेम करणाऱ्यांना वयाच्या बंधनाखाली शिक्षा देण्यासाठी नाही, असा युक्तिवाद वकीलांनी केला.

न्यायालयाचा निर्णय:

  • न्यायालयाने आरोपीच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.
  • आरोपीवर काही अटी-शर्ती लादण्यात आल्या आहेत.

वकीलांचे मत:

  • पॉक्सो कायदा अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणापासून बचाव करण्यासाठी पारित करण्यात आला होता.
  • मात्र, सध्या प्रेम प्रकरणांमध्ये युवकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास होत आहे.
  • काही चूक नसताना अनेक मुलं ४-५ वर्षे तुरुंगवास भोगत आहेत आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.
  • पोलीस प्रशासन आणि न्यायालयाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
  • कायदे मंडळाने लवकरात लवकर पॉक्सो कायद्यात योग्य सुधारणा करणं गरजेचं आहे.

 

  • ॲड. सुशांत तायडे (पुणे न्यायालय)
Scroll to Top