पुणे, 06 जानेवारी 2024: पुणे जिल्ह्यातील हवेली(Pune news) तालुक्यातील दिघी येथे तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी फिर्यादी अमोल विलास शिंगाडे (वय 19) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, ते दि. 05 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता पीएमपीएमएल कार्यशाळेचे समोर जुना डुडुळगाव जकात नाका आळंदी मोशी रोड डुडुळगाव ता. हवेली जि.पुणे येथे आपल्या मित्रा नागेश जाधव यांच्यासोबत थांबले असताना काल झालेल्या भांडणाचे कारणावरून आरोपी गणेश चव्हाण, चैतन्य व त्याचे सोबतचे दोन अनोळखी इसमांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीस धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले.
या घटनेत फिर्यादी अमोल शिंगाडे याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.