पीएमपीएलने प्रवासासाठी आता मोबाइल ॲपद्वारे (Pune ) तिकीट काढण्याची सुविधा देण्यात आली आहे .सध्या पीएमपीएलने याची ट्रायल घेणं सुरु केल आहे. यामध्ये पुणेकरांना मोबाईल ॲपद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकिट काढता येणार आहे .
हि सुविधा सध्या सात दिवसासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेली आहे. मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा बालेवाडी ते मनपा या मार्गावर्गावर सुरु करण्यात आली आहे. 256 नंबर या बसमध्ये तुम्हाला तिकीट काढता येणार आहे. 9 बसेसं मनपा ते बालेवाडी या मार्गासाठी सध्या चालू आहेत. याचा फायदा हा असा आहे की प्रवाशांना गर्दीमध्ये देखील तिकीट काढता येणार आहे.