PUNE : पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध

पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना

PUNE NEWS : पुणे शहरामध्ये सध्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत तसेच पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे रस्त्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील स्लो मुव्हीग वाहनांमुळे देखील वाहतूक कोंडी होत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होत आहे.

वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील खालील चौकांमधून पुढील रस्त्यांवर पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या स्लो मुव्हीग वाहनांना (ट्रॅक्टर, रोड रोलर, जेसीबी व इतर) पुणे शहरामध्ये सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.

प्रतिबंधित चौकांची यादी:

१. संचेती चौक जंगली महाराज रोडकडे, गणेशखिंड रोडकडे, कोर्ट रोडकडे २. पौड फाटा चौक कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोडकडे ३. राजाराम पुल डी.पी. रोडकडे ४. दांडेकर पुल शास्त्री रोडकडे ५. निलायम ब्रिज ना.सी. फडके चौकाकडे ६. सावरकर पुतळा चौक बाजीराव रोडकडे ७. लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे ८. सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे ९. पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे १०. खाणे मारूती चौक इस्ट स्ट्रीटकडे ११. पॉवर हाऊस चौक मालधक्का चौकाकडे १२. आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे १३. पाटील इस्टेट चौक आर.टी.ओ. चौकाकडे १४. ब्रेमेन चौक पुणे विद्यापीठ चौकाकडे १५. शास्त्री नगर गुंजन चौकाकडे १६. आंबेडकर चौक सदलबाबा चौकाकडे १७. चंद्रमा चौक सादलबाबा चौकाकडे १८. मुंढवा चौक ताडीगुत्ता चौकाकडे १९. नोबल चौक भैरोबानाला चौकाकडे २०. लुल्लानगर भैरोबानाला चौकाकडे २१. लुल्लानगर – गोळीबार मैदान चौकाकडे २२. लुल्लानगर – गंगाधाम चौकाकडे २३. पुष्पमंगल चौक ते जेधे चौककडे २४. राजस सोसायटी महेश सोसायटी चौकाकडे २५. पोल्ट्री चौक आरटीओ चौकाकडे २६. उंड्री एनआयबीएम कडे २७. पिसोळी हडपसर कडे २८. हांडेवाडी हडपसर कडे २९. अभिमानश्री चौक, बाणेर रोड पुणे विद्यापीठ चौकाकडे ३०. अभिमानश्री चौक, पाषाण रोड पुणे विद्यापीठ चौकाकडे

पुणे पोलीस आयुक्तालयाने या निर्णयामुळे वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment