पुणे : दुकानदाराला खंडणी मागुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक
पुणे, २२ ऑक्टोबर २०२३ : कात्रज येथे एका दुकानदाराला खंडणी मागुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. विनोद बालाजी सोमवंशी (वय २०, रा. दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Pune: The main accused who tried to kill a shopkeeper for extortion was arrested
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ ऑक्टोबर रोजी गणेश सुपर मार्केट, चालक यास आरोपी भुषण भांडवलकर व जावेद शेख यांनी विनोद सोमवंशी याच्या सांगण्यावरुन मारहाण करण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी देवुन, पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन, भुषण व जावेद हे शिवीगाळ करत असताना फिर्यादी हे मध्यस्थी आल्याने विनोद सोमवंशी, भुषण भांडवलकर, जावेद शेख, आकाश कांबळे, तुषार कुचेकर, आदित्य नाईक, गोविंद लोखंडे, सुरज बांदल, प्रविण गुडे, विधीसंघर्षीत बालकांनी घातक हत्यारांनिशी सज्ज होवुन, बेकायदेशीर जमाव जमवुन, फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन फिर्यादी यांचा मुलगा यास विनोद सोमवंशीने “तु आता गेलास, तुला खल्लासच करणार” असे म्हणुन त्याचे डोक्यावर वार करुन जखमी केले. तसेच इतरांनी फिर्यादी, त्यांचा पुतण्या याला व रोहीतचा मेहुणा यास मारहाण करुन फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर व खिडक्यांवर लाथा व दगड मारून, खाली पार्क केलेल्या गाडयांची तोडफोड करुन नुकसान केले.
गुन्हा झाल्यापासुन आरोपी विनोद सोमवंशी हे मिळुन येत नव्हते. ते त्यांचे वारंवार अस्तिव लपवुन वेगवेगळ्या ठिकाणी वावरत होते. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथक त्यांचा शोध घेत होते.
कात्रज काढवा रोडवरील दाडायाच्या कार्यक्रमाकरता आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यान, त्यांनी आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.