Karjat : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना’ अंतर्गत मेंढपाळांना ७५ टक्के अनुदान
Karjat: पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजने’अंतर्गत मेंढपाळ बांधवांना मेंढ्या आणि त्यांच्यासाठी शेड बांधकाम करण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिलं जातं. या योजनेचा लाभ घेतल्यामुळे अनेक मेंढपाळ बांधवांनी आपलं जीवन सुधारलं आहे.
करजत-जामखेड मतदारसंघातील प्रतिमा ढेकणे आणि लक्ष्मण गोरे यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत झाल्याचं लाभार्थी लक्ष्मण गोरे यांचे बंधू भरत यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या मेंढपाळ बंधूंना योजनेचा फायदा मिळाल्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त केल्याचे नमूद केले.
यावेळी त्यांच्या मेंढ्यांचीही पाहणी करण्यात आली. या योजनेंतर्गत मिळालेल्या मदतीमुळे मेंढपाळ बांधवांनी आपल्या मेंढ्यांची काळजी अधिक चांगल्याप्रकारे घेऊ शकली आहे, असे गोरे कुटुंबियांनी सांगितले.
‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजना’मध्ये सहभागी होऊन आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाल्यामुळे मेंढपाळ बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे आणि त्यांनी योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.