बाबर ते राम मंदिराचा ‘500’ वर्षाचा संघर्षाचा प्रवास अखेर सफल, काही तासांत होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा !
पुणे,दि.22 जानेवारी 2024 : अयोध्यापती श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळयाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे.राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरने मशिद बांधली होती व राम मंदिराच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. अखेर हा संघर्षाचा प्रवास मंदिराच्या निर्मितीपर्यंत येऊन पोचला व आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. ई.स. 1528 ला राम मंदिर पाडून त्या ठिकाणी मशिद बांधण्यात आली होती.तब्बल 500 वर्षाच्या लढ्याला यश आलं असून रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या जन्मस्थानी होत आहे.
आज (ता.22 जानेवारी)अयोध्या येथे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.
प्राणप्रतिष्ठेआधी पूजाविधी मागील सहा दिवसांपासून सुरु झाला असून, या नयनरम्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी श्रीरामांच्या स्वागतासाठी फुलांनी व विद्युत रोशणाईनं सज्ज झाली आहे. या पार्शभूमीवर सगळ्या देशाचं लक्ष अयोध्यावर केंद्रित झाले असून भाविक रामलल्लाची मूर्ती बघण्यासाठी व दर्शनासाठी उत्सुक आहेत.
हे वाचा : अभिषेकाचा मुहूर्त काय आहे ?
आजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.16 जानेवारीपासून अभिषेकाशी संबंधित सर्व विधी सुरु झाले असून आजच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा स्थापना आहे. तर यासाठी शुभ मुहूर्त जानेवारी रोजी दुपारी,12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदापर्यंत असेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील.
आजच्या दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक असून श्रीरामाच्या स्वागतासाठी आनंदमय वातावरण परसरलेलं आहे.