हिंजवडी येथे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा – तीन अनोळखी इसमांनी केली पिस्तल वापरून चोरी !

0
Pune news

Pune news

हिंजवडी येथे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा – तीन अनोळखी इसमांनी केले पिस्तल वापरून चोरी

हिंजवडी, पुणे: हिंजवडी येथील शिवमुद्रा ज्वेलर्स, लक्ष्मी कॉप्लेक्स, लक्ष्मी चौक येथे दि. ०२/०८/२०२४ रोजी सकाळी १०:१७ वाजता तीन अनोळखी इसमांनी पिस्तल वापरून दरोडा टाकला. ही घटना सुधाकर पोपट पाटील (वय २५ वर्षे), व्यवसाय ज्वेलर्स दुकानदार, राहणार- फ्लॅट नं. ११०४, सी. विंग, कॅपिटल टॉवर, दत्तमंदिर रोड, वाकड, पुणे यांच्या दुकानात घडली.

सकाळी दुकानात असताना, तीन अनोळखी इसमांनी पिस्तलसह दुकानात प्रवेश केला आणि पिस्तलने सुधाकर पाटील यांना मारहाण करून जखमी केले. त्यांनी दमदाटी करून दुकानातील १७,६००/- रुपयांचे बेंटेक्सचे दागिने चोरी केले आणि घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेची नोंद भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३५१ (३), आर्म अॅक्ट ३(२५), आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ अंतर्गत करण्यात आली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

ही घटना दि. ०२/०८/२०२४ रोजी १५:२१ वाजता घडल्याचे नोंद करण्यात आले आहे. हिंजवडी परिसरात झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींच्या शोधात आहेत आणि लवकरच त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *