WCD परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी तीव्र, उमेदवारांनी आंदोलन उभे केले
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेली WCD परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे वादग्रस्त ठरली आहे. कर्नाटकातून पेपरफोडणारेला अटक झाल्यानंतरही सरकार अद्याप परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही. यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि त्यांनी आंदोलन उभे केले आहे.
उमेदवारांनी #WcdReExam हॅशटॅगसोबत सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. ते WCD परीक्षा रद्द करून लवकरात लवकर TCS ION द्वारे पुन्हा घेण्याची मागणी करत आहेत. उमेदवारांनी अजित पवार यांना टॅग करत ट्विटमध्ये म्हटले आहे, “आमच्या पेपरफुटी दिसेना का तुम्हाला? सरकारच नाचता येईना? आंगण वाकड झालाय? काल कर्नाटक मधून WCD paper फोडणारेला अटक झालीय. अजून सरकार #serious नाहीय @AjitPawarSpeaks.”
उमेदवारांचा युक्तिवाद आहे की पेपरफुटीमुळे परीक्षा प्रक्रिया निष्पक्ष झालेली नाही आणि अनेक पात्र उमेदवारांना निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे. ते मागणी करतात की परीक्षा रद्द करून पुन्हा घेणे हाच या समस्येवरचा एकमेव उपाय आहे.
उमेदवारांनी 1 महिन्याच्या आत परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय न घेतल्यास, ते आंदोलनाचा पसारा वाढवण्याचा इशारा दिला आहे.
उमेदवारांच्या मागण्या:
- WCD परीक्षा रद्द करा.
- TCS ION द्वारे लवकरात लवकर परीक्षा पुन्हा घ्या.
- 1 महिन्याच्या आत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन उभे केले जाईल.
#WcdReExam