वाळूज परिसरात धक्कादायक घटना, 12 ते 14 वर्षांच्या मुलांचा तलावात बुडून मृत्यू

पुणे,दि.12 जानेवारी,2024 : वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या मुलांचे वय 12 व 14 वर्षे होते.ही घटना गुरुवारी(11जानेवारी) सायंकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

ही मुलं रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी असुन, अबराज जावेद शेख वय – 12, अफरोज जावेद शेख वय – 14,सुखदेव उपाध्याय वय – 12 व कुणाल दळवी वय – 13 अशी मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.
ही मुलं बराच वेळ घरी न आल्यामुळं पालकांनी विचारपूस करायला सुरुवात केली असता ती पाझर तलावाकडे गेली अशी माहिती मिळताच पालक तिथे पोचले. तलावाबाहेर मुलांचे कपडे ,चप्पल व मोबाईल असे सामान बघितल्यावर पालकांनी मुलं बुडाल्याची खात्री केली व पोलिसांना कळवले. नागरिकांच्या मदतीने वाळूज अग्निशमन दलाचे पी.के. चोधरी,बी शेंडगे व इतर कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व इतर सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.

Leave a Comment