
आकाशवाणी पुणे केंद्र बातम्या चालूच राहणार ! बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती !

आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहेत, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.