नवी मुंबई येथील मागील 2 दिवसांत बेपत्ता झालेल्या 8 मुलांपैकी 6 मुलांना शोधण्यात यश आले आहे. पालकांच्या तक्रारीनुसार ही सगळी मुलं12 ते 15 वयोगातील असुन पनवेल, कामोठे ,कोपरखैरणे, रबाळे व कोळंबोलीतील होती. या घटनेमुळं नवी मुंबईत भीतीचे वातावरण पसरलंहोतं.पण मुंबई पोलिसांना 8 पैकी 6 मुलांना शोधण्यात यश आलं आहे . या मुलांचं अपहरण झालेलं नसुन त्यातील काही मुलं रागावून तरकाही वेगवेगळ्या निमित्तानं बाहेर गेली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मुलं बेपत्ता असल्यामुळं पोलिसांनाही खळबळ होती पणआता 8 पैकी 7 मुलं सापडली आहेत.
या मुलांमध्ये 5 मुली व 3 मुलांचा समावेश होता. त्यापैकी कोपरखैरणेमधुन जो मुलगा होता तो त्याने आपल्या वडिलांनी फ़ुटबाँलच्या क्लासलाऍडमिशन दिली नाही म्हणुन स्वतःहून पळुन गेला होता अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. या सगळ्या प्रकारामुळं पालक चांगलेच घाबरले असुन सगळीकडेच भीतीचे वातावरण पसरलेलं आहे. बाकी 2 मुलांचा शोध अद्यापही चालु आहे .