परळी (वैजनाथ) नगरीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गोपीनाथ गडावर हजेरी लावली आहे. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंढे व भाजपनेत्या पंकजा उपस्थित असुन मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्याचं स्वागत पंकजा मुंढेकडून करण्यात आलं आहे.
मागील काही काळापासून महाराष्ट्रातील राजकारण दिशाहीन झालेलं असताना आता पंकजा मुंढे,देवेंद्र फडणवीस व धनंजय मुंढे यांना एकाच व्यासपीठावर बघून राजकीय वर्तुळाला नवीन दिशा फुटली आहे .मागील विधानसभा निवडणुकीनंतर भाऊ-बहीण एकत्र आल्यानं त्यांच्यातील राजकीय दुरावा नाहीसा झालेला दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून पंकजा मुंढे या भाजप मधून बाहेर पडणार अशा चर्चा रंगल्या होत्या परंतु आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने धनंजय मुंढेसह त्या उपस्थित असल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बहीण-भाऊ एकत्र लढणार कि एकमेकांच्या विरोधात लढणार हे बघणं चुरशीचं ठरणार आहे .