MPDA action under PCB :पीसीबी, गुन्हे शाखा, पुणे शहर अंतर्गत एमपीडीए कारवाई पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे सत्यवान शाखा राठोड, वय-३३, काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारु तयार करणे, विक्री करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होवून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी सादर केलेला प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन श्री. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी. डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले असून, त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. नमुद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री. दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.