Pune सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामांमुळे या रस्त्यावरील वाहतूक वारंवार कोंडी होते. त्यामुळे या रस्त्याला समांतर असलेल्या कालव रस्त्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कालव रस्ता हा एकेरी असल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना अडचणी येत आहेत.
कालव रस्त्याच्या पादचात्यांच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना सकाळ-संध्याकाळच्या वेळेत चालण्यासाठी अडचणी येत आहेत.
स्थानिक रहिवाशांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे. प्रशासनाने पादचात्यांच्या मार्गावरील झुडपे काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे.