Pimpri-Chinchwad : हिंजवडीतील बस स्टॉपवर अपघातात एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

हिंजवडीतील बस स्टॉपवर अपघातात एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

हिंजवडी, २७ मे २०२४ – मुंबई-बॅंगलोर हायवेवरील शनीमंदिर वाकड (Hinjewadi bus ) येथील बस स्टॉपवर रात्री १.३० वाजता झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी सचिन दिनेश गोस्वामी (वय २६ वर्षे), जो धंदा फेरीवाला आहे व जनकल्याण सोसायटी, पी. एम.जी. कॉलनी, मानखुर्द, वाशी, नवी मुंबई येथील रहिवासी आहे, त्याने गुन्हा दाखल केला आहे.(Pimpri-Chinchwad)

 

सचिन गोस्वामी आणि त्यांचा मित्र अंगद शिवयोग्य गिरी (वय २८ वर्षे) हे बॅन्टेक्सची ज्वेलरी विकण्यासाठी शनीमंदिर वाकड येथील बस स्टॉपवर थांबले होते. अंगद शिवयोग्य गिरी लघवी करण्यासाठी बस स्टॉपच्या मागील बाजूस सर्विस रोड ओलांडत असताना, काळ्या रंगाच्या थार गाडी (क्र. एम. एच. १४ एल जी. ७५८५) वरील चालक वेदांत नागेंद्र राय (वय २० वर्षे, रा. मारुंजी, ता. मुळशी) याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गाडी भरधाव वेगाने, बेदरकारपणे व हयगईने चालवून अंगद गिरी यांना धडक दिली. या धडकेत अंगद गिरी गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

 

या घटनेप्रकरणी भा.दं.वि. कलम ३०४ (अ), ३३८, ३३७, २७९ सह मां.वा.का. कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २७ मे २०२४ रोजी सकाळी ७.२४ वाजता गुन्हा नोंदवला आहे. आरोपी वेदांत नागेंद्र राय याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Leave a Comment