Pimpri Chinchwad: महाळुंगे एमआयडीसी, तरुणीचा तिक्ष्ण हत्याराने खून

महाळुंगे एमआयडीसी: खून प्रकरणात ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad , १३ जून २०२४: महाळुंगे एमआयडीसी (pimpri chinchwad news) परिसरात भीषण खून प्रकरण उघडकीस आले आहे. दि. १३ जून रोजी सकाळी ६:४५ ते ८:०० वाजता दरम्यान मौजे करंजविहीरे, ताखेड, जि. पुणेगावच्या हद्दीमध्ये अदित खडीक्रशर जवळील कोरडे कॅनॉल मध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे.

फिर्यादी बमभोले कन्हैयालाल (वय २६ वर्षे, व्यवसाय: जेसीबी चालक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी सौ. ममतादेवी बमभोले (वय २० वर्षे) संडास करण्यासाठी गेली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिच्यावर तिक्ष्ण हत्याराने हल्ला करून तिचा गळ्यावर उजवे बाजूस वार करून तिचा खून केला आहे.

घटनेची नोंद १३ जून रोजी दुपारी ४:१३ वाजता करण्यात आली असून, या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी सपोनि घाडगे  यांना या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Jobs: इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपन्यांमध्ये सुवर्णसंधी: पोलिसांपेक्षा जास्त पगार

Onion Market Price Today In Pune : शेतकऱ्यांना हसवणार तर तुम्हाला रडवणार कांदा !

Realme NARZO N63 : रिअलमी चा हा खतरनाक स्मार्टफोन फक्त साडे ८ हजार रुपयात!

सदर घटना अत्यंत गंभीर असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाचा वेग वाढवला आहे. अद्याप कोणताही संशयित हाती लागला नसून, या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या खून प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

Leave a Comment