फुरसुंगी, भेकराईनगर भागात रस्त्यांची बिकट अवस्था



फुरसुंगी आणि भेकराईनगर भागातील पुणे-सासवड रस्ता अक्षरशः चाळण झालेला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी छोटी डबकी तयार झाली आहेत, ज्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविणे कसरतीचे काम झाले आहे. रस्ता खराब असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता या रस्त्याचे काम तातडीने होणे आवश्यक आहे.

तसेच, भेकराईनगर येथील ओढ्याचे संरक्षण कठडे देखील ढासळले आहेत. यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Comment