Pune उरळी देवाची फुरसुंगी परिसरात पाण्याचा टँकर च्या धडकेत लहान मुलाचा मृत्यू

0
Pune news

Pune news

Pune News : उरळी देवाची फुरसुंगी परिसरात पाण्याचा टँकर च्या धडकेत लहान मुलाचा मृत्यू

उरळी देवाची, पुणे: २१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता (Pune News Marathi ) उरळी देवाची फुरसुंगी येथील पी एम प्लॅस्टीक भंगार दुकानासमोर घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

फिर्यादी बबीतादेवी महतो (वय २२, रा. उरळी देवाची, फुरसुंगी, पुणे) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी विजयकुमार बालाजी फड (वय ३२, रा. लोहगाव, पुणे) याने त्याच्या ताब्यातील पाण्याचा टँकर वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने व भरधाव वेगात चालवला. या टँकरच्या धडकेत फिर्यादी यांचा लहान मुलगा कृष्णा राहुल महातो (वय १ वर्ष) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटना घडली तेव्हा कृष्णा घराच्या बाहेर खेळत होता, आणि त्यावेळी टँकर त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

हे पण वाचा – घरबसल्या कामाची संधी २ ० ० ० ०  पगार 

पोलिस कारवाई
कलम १०६ (१), २८१, सह मो. वा. का. क. १८४, ११९/१७७ आणि १३४ (अ), (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विजयकुमार बालाजी फड याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास काळेपडळ पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

परिसरात शोककळा
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान मुलगा कृष्णाचा दुर्दैवी मृत्यू हे कुटुंबासाठी अपूरणीय नुकसान आहे.

पोलीस नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *