पुणेतील हनुमान टेकडी येथे चाकूच्या धाकाने सोन्याचे दागिने हिसकावले
डेक्कन, (Deccan)पुणे: दिनांक २१/०५/२०२४ रोजी रात्री २०/०० वा. च्या सुमारास (Deccan Pune News )हनुमान टेकडी (Hanuman Tekdi)येथे एक गंभीर चोरीची घटना घडली. फिर्यादी, वय २२ वर्षे, रा. पुणे, आणि तिचे मित्र बेंचवर बसलेले असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटातील तीन सोन्याच्या अंगठ्या, ज्याची एकूण किंमत ५०,०००/- रुपये आहे, जबरदस्तीने हिसकावून घेतल्या.
पोलीस स्टेशन डेक्कन येथे गु.र.नं. ७०/२०२४, भादविक कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही आणि त्यांना अटकही झालेली नाही.
पोलिसांनी तपास सुरू केला असून हनुमान टेकडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. नागरिकांना सावधान राहण्याचे आणि अशा कोणत्याही संशयास्पद व्यक्तींविषयी पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.