कोरेगाव पार्क मध्ये तहसीलदारांवर हल्ला, अतिक्रमण कारवाईत अडथळा!

कोरेगाव पार्कमध्ये तहसीलदारांवर हल्ला, अतिक्रमण कारवाईत अडथळा

Pune News : कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park News ) अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तहसीलदार पुणे शहर (Pune City News )पदावर कार्यरत असलेले फिर्यादी आणि त्यांचे सहकारी अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत गुंतले होते. या दरम्यान, दोन अज्ञात इसमांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर धावून येऊन, नमूद ठिकाणाचे रहिवासी आणि दुकान/टपरी चालक/मालक यांच्यामध्ये साशंकता निर्माण केली. या घटनेमुळे वातावरण प्रक्षोभक झाले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

सावधान! आळंदीतील फेक लव्ह मॅरेज रील्सच्या आहारी जाऊ नका

 

शिवाय, आरोपींनी शासकीय अधिकार्‍यांवर हल्ला करताना त्यांचे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपासासाठी म.पो.उप.निरी. भारती इंगोले हे कार्यरत आहेत.

Leave a Comment