रोहित पवारांनी पुढे असा आरोप केला की, भाजपने नेत्यांना पाठवून या ठिकाणी राडा घडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लपविण्याचा प्रयत्न झाला. मविआ (महा विकास आघाडी) चे नेते या ठिकाणी पाहणी करायला गेले असता, त्यांनी भाजपच्या गावगुंडांना पाठवून सरकारी भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून अडथळे आणले.
सागर बंगल्याच्या संरक्षणामुळे पत्रकारांचे माईक हिसकावण्यापासून ते पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावी करण्यापर्यंत मजल जायला लागली आहे, हे अत्यंत चिंताजनक असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गुलामगिरी करणाऱ्या गावगुंडांचा जाहीर निषेध केला आहे.
या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढे काय घडामोडी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ladki bahin yojna form bhrun milele 8329865383
#राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या कामात दलाली खाल्ल्याने महाराजांचा पुतळा कोसळला हि वस्तुस्थिती आहे .त्या ठिकाणी #मविआ नेते पाहणी करायला गेले असता सरकारचा भ्रष्टाचार उघडा होऊ नये म्हणून भाजप नेत्यांना तसेच #स्वाभिमान विकलेल्या गावगुंडांना पाठवून राडा करणे देवेंद्र फडणवीस यांना… pic.twitter.com/HvljUY8d7u
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 28, 2024