पुणे, ३० जून २०२५: पुणे-सोलापूर महामार्गावर (pune solapur highway) बोरकर वस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथे एक भीषण अपघात झाला आहे. ३० जून २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.(pune solapur highway accident)
हिंजवडी (hinjawadi) येथील २८ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचा मित्र संतोष शेषेराव जाधव (वय ३०, रा. शिंदेवस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी) त्यांच्या मोटारसायकलवरून जात असताना, एका अज्ञात ट्रक चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत, निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगात ट्रक चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत फिर्यादीला किरकोळ दुखापत झाली, तर त्यांचा मित्र संतोष जाधव यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा (गु.र.नं. २९५/२०२५) दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ११९/१७७, १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ट्रक चालक अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.