Pune : पुण्यात दारूच्या नशेत सासऱ्याने केली मेहुण्याची हत्या!

pune dattawadi crime news
Pune News : फुरसुंगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून (Murder Case in Pune) कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच आपल्या ३५ वर्षीय जावयाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २० जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास वलवा वस्ती, वडकी, पुणे येथे घडली.
फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये (पो.स्टे. फुरसुंगी) गु.र.क्र. २२४/२०२५, भादंवि कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश बाबुराव जमदाडे (वय ५९, रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५) हा मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन आपल्या सासू-सासऱ्याला शिवीगाळ करत होता. यावेळी रागाच्या भरात त्याचा सासरा सुरेश जमदाडे यांनी त्याच्याशी झटापट करत त्याला जमिनीवर पाडले आणि गमजाने गळा आवळून डोकं फरशीवर आपटून त्याचा जीव घेतला.
या प्रकरणात फिर्यादी म्हणून मृताचा मेहुणा (वय ३६, रा. फुरसुंगी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.