
लोणीकंद येथे ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघड; ४९ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दि. २५ ऑक्टोबर २०२४ ते दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत फिर्यादी यांच्याशी ऑनलाइन संपर्क साधला. त्याने फिर्यादींना विविध शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.
सुरुवातीला थोडाफार नफा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपीने फिर्यादींना त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. या माध्यमातून त्याने फिर्यादींची ५ लाख ५४ हजार ८८७ रुपयांची फसवणूक केली.
या घटनेनंतर फिर्यादीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या आरोपीला अटक झालेली नाही. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी सावध राहावे आणि अज्ञात व्यक्तींवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिस अधिक तपास करत असून, या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.