पुणे शहर

Pune : मंगळवार पेठेत लिफ्ट मध्ये वाद ! महिलेला शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण !

Pune News

पुणे: मंगळवार पेठेतील सदाआनंद नगर परिसरात लिफ्टवर वाद झाल्याने एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एका महिलेचा शोध सुरू आहे.

सदाआनंद नगर मंगळवार पेठ पुणे येथे यातील नमुद इसम यांचा मुलगा याने सदाआनंद नगर मंगळवार पेठ पुणे येथे दिनांक ०३/०५/२०२४ रोजी तळमजल्यावर सोसायटीची लिफ्ट उघडून येण्याजाणा-या लोकांना अडथळा करीत असताना यातील फिर्यादी यांनी त्यास तु एवढी गर्दी असताना लिफ्ट उघडी ठेवून लोकांना त्रास का देतो? असे म्हणाले.

हडपसर मध्ये Office Assistant हवा आहे ! जागा – १ पगार – २१ हजार रुपये – इथं करा अर्ज !

Become an Agniveer (MR) in the Indian Navy: Your Guide to the 02/2024 Batch Recruitment

१२ वि पास मुलामुलींसाठी हडपसर मध्ये नोकरीची संधी , २० हजार रुपये पगार !

त्या कारणावरुन वर नमुद केले ता. वेळी यातील नमुद इसम यांनी संगनमताने फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन रागाने फिर्यादी व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यानंतर फिर्यादी व त्यांची पत्नी हे घाबरुन साक्षीदार यांच्या घरामध्ये गेले असता, फिर्यादी यांना पकडून साक्षीदार यांचे घरातुन काच घेऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या डोक्यात जोरात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पत्नीचे केस धरुन मारहाण केली आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *