Pune पुण्यात चालू होती ऑनलाईन सिगारेट आणि तंबाखू विक्री , विक्रेत्यांवर धडक कारवाई!

0
Pune City Crime Branch crackdown on e-cigarette sellers

Pune City Crime Branch crackdown on e-cigarette sellersपुणे शहर गुन्हे शाखेची ई सिगारेट विक्रेत्यांवर धडक कारवाई

पुणे, ७ जून २०२४ – पुणे (Pune )शहरातील ई सिगारेट, वेप आणि तंबाखूजन्य फ्लेवर विक्रेत्यांवर आज पुणे शहर गुन्हे शाखेने मोठी छापा कारवाई केली. मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री प्रविण पवार, आणि मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. श्री सुनिल तांबे, सहा पो आयुक्त, गुन्हे १, आणि मा. श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. ७ जून २०२४ रोजी दिवसभर राबविण्यात आलेल्या या विशेष अभियानामध्ये पुणे शहरातील एकूण १८ ठिकाणी छापा मारण्यात आला.

Realme NARZO N63 : रिअलमी चा हा खतरनाक स्मार्टफोन फक्त साडे ८ हजार रुपयात!

 

या कारवाईदरम्यान, एकूण २१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण १०,६७,५९४/- रुपयांची ई सिगारेट, वेप तसेच तंबाखूजन्य फ्लेवर जप्त करण्यात आली आहे. आरोपींवर सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ७ (२), २० (२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांनी जाहीर केले आहे की, या कारवाईत सातत्य ठेवून पुणे शहरातील ई सिगारेट, वेप, आणि तंबाखूजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यांचे समुळ उच्चाटन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *