Pune parking : पुणे शहर वाहतूक नियंत्रण विभागाचा नवीन आदेश !
पुणे शहर वाहतूक नियंत्रण विभागाचा नवीन आदेश: डेक्कन वाहतूक विभागांतर्गत पार्किंगचे नियमन
Pune parking : पुणे शहरातील डेक्कन वाहतूक विभागांतर्गत वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त, अमोल झेंडे यांनी तात्पुरते पार्किंगचे नवीन नियम लागू केले आहेत.
नवीन पार्किंग आदेशानुसार:
- रोहिणी भाटे चौक गल्ली क्रमांक ०७, प्रभात रोड ते आयसीसी, भांडारकर रोड या रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पी १ व पी २ पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नागरिकांसाठी सूचना:
तरी नागरीकांनी सदर पार्किंग नियमनाबाबत आपल्या हरकती किंवा सूचना दिनांक १४/१०/२०२४ ते २९/१०/२०२४ या कालावधीत, पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे येथे लेखी स्वरुपात कळवाव्यात.
सर्व नागरीकांच्या सूचना व हरकतींचा विचार करून, अत्यावश्यक सेवांमध्ये येणारी वाहने जसे की फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांना वगळून अंतिम आदेश जारी केले जातील.