पुणे: धक्कादायक! ‘काकडे बीझ आयकॉन’ येथे किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

पुणे: धक्कादायक! ‘काकडे बीझ आयकॉन’ येथे किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण (Pune crime news, Assault case, Ganeshkhind Road incident)

पुण्यातील गणेशखिंड रोडवरील काकडे बीझ आयकॉनच्या पार्किंगमध्ये एका तरुणाला मुलीसोबत बोलल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या ४५ वर्षीय इसमाच्या चुलत भावाला गणेश बंडु तौर (वय २७, रा. आव्हाळवाडी, वाघोली) आणि लिंगेश्वर महादेव तोडकरी (वय २७) या दोघांनी २८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मारहाण केली. मुलीसोबत बोलत असल्याच्या रागातून आरोपींनी शिवीगाळ करत, हाताने व लाकडी बांबुने मारहाण करून गंभीर जखमी केले.

या घटनेनंतर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११५ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा (गु.घ.ता.वेळ व ठिकाण दि. २८/०८/२०२५ रोजी २०/०० वा.चे सुमा. काकडे बीझ आयकॉन गणेशखिंड रोड पुणे येथील पार्कीगमध्ये गणेशखिंड रोड पुणे) दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी लिंगेश्वर महादेव तोडकरी याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सचिन कारंडे करत आहेत.

पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, किरकोळ कारणावरून होणाऱ्या मारामारीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Comment