पुणे लाईव्ह न्युज मराठी : सोनाराच्या दुकानात अशी करायचा चोरी , कोथरुड परिसरात शोध घेऊन अटक
पुणे लाईव्ह न्युज मराठी: सोनाराच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने चैन चोरी करणारा आरोपी जेरबंद
पुणे: २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव-धायरी परिसरातील एक सराफी दुकानात सोन्याची चैन खरेदी करण्याचा बहाणा करत एका अनोळखी इसमाने दुकानात प्रवेश केला. त्याने दुकानदारांच्या नजर चुकवून सोन्याची चैन गळ्यात घालून दुकानातून चोरी केली. या प्रकरणी सिंहगडरोड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी गुन्हा रजि. नं. ६९५/२०२४ बी.एन.एस.२०२३ अंतर्गत भा.दं.वि. ३०३ (२) कलमाने गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ पुणे शहर व मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगडरोड विभाग पुणे यांच्या आदेशाने दोन तपास पथकांची टीम तयार केली. तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार तारु, क्षीरसागर, मोहीते यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, आरोपी कोथरुड परिसरात लपून बसलेला आहे.
बातमी मिळताच तपास पथकाने कोथरुड परिसरात संशयीत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. आरोपीला अटक करून चोरी केलेली सोन्याची चैन त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.