Pune : सिंहगड रोडवर मोलकरणीने पाच कुटुंबांना लाखोंना गंडवले , इथे पहा

Pune : घरात कामासाठी ठेवलेल्या मोलकरणीनेच विश्वासघात करत एकाच सोसायटीमधील पाच कुटुंबांच्या घरातून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड() परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी सिंहगड रोड येथील एका ४१ वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एका महिलेविरुद्ध (अद्याप अटक नाही) गुन्हा नोंदवला आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६५/२०२५ अन्वये, भारतीय न्याय संहिता कलम ३०६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सन २०२४ ते १७ जुलै २०२५ या कालावधीत सिंहगड रोडवरील मधुकोश अपार्टमेंट, आय विंग, लगडमळा येथे घडली. आरोपी महिला फिर्यादी यांच्या घरी घरकामासाठी होती. तिने फिर्यादी यांची नजर चुकवून घरातून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरले.
तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी महिलेने केवळ फिर्यादीच्याच घरात नव्हे, तर त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या इतर चार जणांच्या घरीही अशाच प्रकारे चोरी केली आहे, जिथे ती घरकामाला होती. या पाचही घरातून तिने एकूण १५,६०० रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून अंदाजे ३,७३,१०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.