Pune News : हृदयद्रावक! विमाननगर येथे कौटुंबिक वादातून पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या

0
523201670_1935787900530614_9062948147682849807_n

Pune News : विमाननगर परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचे पर्यवसान एका भीषण हत्येत झाले असून, पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला आहे. ही घटना इंदूरी पोहा हॉटेलजवळ, मारी गोल्ड बिल्डिंग परिसरात दिनांक २४ जुलै रोजी सकाळी १०:४५ ते रात्री ९:३० च्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेम उत्तम जाधव (वय २७, रा. काजळी तांडा, जिंतूर, परभणी) याने वैवाहिक कलहातून संतप्त होऊन आपल्या पत्नी ममता प्रेम जाधव (वय २१) हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. ममता ही सध्या पतीपासून वेगळी राहत होती आणि नांदायला येण्यास नकार देत होती. यामुळे आरोपीने संतापाच्या भरात तिच्यावर थेट प्राणघातक हल्ला केला.

घटनेदरम्यान मृत महिलेची मावशी मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपीने त्याच हत्याराने तिच्या उजव्या हातावर वार करून तिलाही गंभीर जखमी केले. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सध्या पोलिस तपास सुरू असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे हे भयावह उदाहरण असून, संपूर्ण परिसरात या घटनेमुळे भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

अधिक माहितीसाठी:
https://whatsapp.com/channel/0029VaajOdC6hENuzm00YV0hPune News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *