Pune: पिंपरी चिंचवडच्या देहूरोड परिसरात अनेक दुकानांना आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

पिंपरी चिंचवड: पुण्याच्या देहूरोड परिसरात असलेल्या अनेक दुकानांमध्ये आज भीषण आग लागली आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आग लागल्यानंतर त्वरित अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, तसेच सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.
पुढील तपशीलांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आणि अग्निशमन दलाकडून अधिकृत माहितीची अपेक्षा आहे.