Pune: पुण्यात मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक उत्साहात

पुणे: मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मिरवणूक आज उत्साहात काढण्यात येणार आहे. सकाळी साडेआठ वाजता श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून मार्गस्थ होईल. मिरवणूकीचा मार्ग रास्ता पेठ पॉवर हाऊस येथून सुरू होऊन, दारुवाला पूल, देवजी बाबा चौक, फडके हौद या मार्गाने उत्सव मंडपापर्यंत असेल.

गणेश भक्तांमध्ये या मिरवणुकीची विशेष उत्सुकता असून, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची ही एक अत्यंत महत्त्वाची परंपरा मानली जाते.

Leave a Comment