Pune : एन.सी.एल पाषाण येथील चंदनाचे झाड चोरीला: व्यवस्थापकाने केली तक्रार

Sandalwood tree stolen

Pune, १४ जून २०२४: चतुःश्रृंगी पोलीस ठाणे (Chathushringi Police Station) हद्दीत एक गंभीर चोरीची घटना उघडकीस आली आहे. विनीत जोशी, वय ४०, कोथरूड (kothrud pune)येथील रहिवासी आणि एन.सी.एल. पाषाण (ncl colony)येथील व्यवस्थापक, यांनी तक्रार दाखल केली आहे की, पहाटे ४:३० च्या सुमारास लेक्चर थिएटर जवळील व्हेचुर सेंटर(Veture Center)मधील चंदनाचे झाड कापून त्याचा बुंध्याचा तुकडा चोरून नेला आहे. चंदनाच्या झाडाची किंमत सुमारे ५,००० रुपये आहे.

अज्ञात आरोपीने ही चोरी केली असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार माने तपास करत असून परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चोराचा तपास सुरू असून लवकरच आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

PCMC मध्ये १२ वी पाससाठी मोठी भरती! महिला आणि मुलींसाठी सुवर्णसंधी – २०१ जागांसाठी अर्ज करा!

Jobs: इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपन्यांमध्ये सुवर्णसंधी: पोलिसांपेक्षा जास्त पगार

2024 मध्ये 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकऱ्या

Leave a Comment