पुणे, धायरी: DSKविश्व येथे सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली. डंपर एका ज्येष्ठ व्यक्तीच्या हातावरून गेल्याने त्यांना गंभीर जखमी केले आहे. या अपघातामुळे संतप्त रहिवाशांनी त्वरित प्रतिक्रिया दिली व सोसायटीचा गेट बंद करून डंपर वाहतूक रोखली आहे.
घटनेच्या ठिकाणी जमलेल्या रहिवाशांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे व संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.