संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमन

संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमन जालना: संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचं मराठवाडा हद्दीत आगमन झालं आहे. जालन्यातल्या वाघ्रुळ जहांगीर गावात पालखीचं मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं. गावकऱ्यांनी जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल या जयघोषाने परिसर दुमदुमवला आणि भक्तिमय वातावरण तयार केलं. या पालखी सोहळ्यात गावातील सर्व वयोगटातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला.