Maha Traffic app : वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी महा ट्राफिक अँप लॉन्च !
वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी महा ट्राफिक अँपची मदत घ्या !
वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी महा ट्राफिक अँपची मदत घ्या
पुणे : महाराष्ट्र पोलीस दलाने वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी महा ट्राफिक अँप उपलब्ध करून दिले आहे. या अँपच्या माध्यमातून वाहन चालकांना त्यांच्या वाहनावरील चलनाची माहिती मिळू शकते. तसेच, चुकीचे चलन झाल्यास तक्रार करणे देखील शक्य आहे.
महा ट्राफिक अँप डाऊनलोड करण्यासाठी, वाहन चालकांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये Google Play Store वर जाऊन “MahaTrafficapp” नावाने सर्च करावे. अँप डाउनलोड झाल्यानंतर, वाहन चालकांनी त्यामध्ये आपला मोबाईल नंबर आणि वाहन क्रमांक नोंदवला पाहिजे.
अँपद्वारे मिळणारी माहिती खालीलप्रमाणे आहे:
- वाहनावर किती चलन प्रलंबित आहेत.
- वाहनावर कोणत्या ठिकाणी व कोणत्या कलमान्वये ई चलन झालेले आहे.
- अँप मध्ये सदर दंड भरण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
- दंडाची रक्कम भरली असल्यास त्याचा तपशील.
- चुकीचे ई चलन झाले असेल तर तक्रार करण्यासाठी ग्रेवीयन्स ऑप्शन.
- कोणत्या कलमासाठी किती दंड आहे याची माहिती.
महा ट्राफिक अँप हे गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तसेच, युट्युब वर अँप हाताळणे बाबतचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहेत. अँप बाबत अधिक माहितीसाठी हेल्पलाइन संपर्क क्रमांक ८४४८४४८९६० वर संपर्क साधावा.
वाहतूक पोलिसांनी महामार्गावर वेग मर्यादा ओळखणारे स्पीड डिटेक्टिव्ह कॅमेरे बसवले आहेत. तसेच, पिंपरी चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकावर दंड आकारण्यात येतो. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून दंड टाळावा.
दोऊनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा
महा ट्राफिक अँपच्या माध्यमातून वाहन चालकांना त्यांच्या वाहनावरील चलनाची माहिती आणि दंड भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी या अँपचा अवश्य वापर करावा.