दुसरीपर्यंतच्या शाळांची वेळ सकाळी नऊ नंतरची, नवीन वर्षात नवीन वेळ,शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची घोषणा
पुणे,दि.19 डिसेंबर, 2023 : 2024 पासून दुसरीपर्यंतची शाळा सकाळी नऊनंतर असेल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. सकाळच्या शाळांमुळे मुलांची पुरेशी झोप होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यपाल रमेश बैस यांनी लहान मुलांच्या सकाळच्या शाळेंच्या वेळेबद्दल हा मुद्दा मांडला होता. सकाळच्या शाळांमुळे मुलांची पूर्ण झोप होत नाही, बदलत्या जीवनशैली मूळे अभ्यासक्रम सुद्दा अवघड झाला आहे, त्यातच लहान मुलांच्या शाळा सकाळी असल्यामुळे त्यांना पुरेशी झोप सुद्धा मिळत नाही. आरोग्यासाठी पूरक आहारासोबत पुरेशी झोप सुद्धा गरजेची असते. तसेच झोप पूर्ण झाल्यावर मुलं आवडीने अभ्यास करतील असे केसरकर म्हणाले.
शाळांच्या वेळा बदलण्याबाबत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभिनयाच्या शुभारंभाच्या वेळी राज्यपाल रमेश यांनी केलेल्या मागणीला अणेक पालकांचा त्याला पाठिंबा होता. बऱ्याच पालकांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते अशातच सकाळची धावपळ व मुलांची झोप याबाबत त्यांचा उशिराच्या वेळेला सहकार्य दाखवले.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सध्या दुसरीपर्यंतची शाळा सकाळी ९ वाजता होणार असल्याची माहिती दिली आहे तसेच इतर वर्गांबाबत अद्याप निर्णय घेतला नाही त्यासाठी समितीची स्थापना केली जाईल असे केसरकर यांनी सांगितले आहे.
सध्याच्या गारठून टाकणाऱ्या थंडीपासून शाळेच्या वेळेत झालेल्या बदलामुळं विद्यार्थी तसेच पालकांना दिलासा मिळणार आहे.